डेक्कन ओडिसीच्या आगमनाने पर्यटन हंगामाला प्रारंभ
उज्ज्वला साळुंके
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो): महाराष्ट्राच्या पर्यटन नकाशावर महत्त्वाचे स्थान असलेल्या छत्रपती संभाजीनगर शहरात यंदाच्या पर्यटन हंगामाला आलिशान डेक्कन ओडिसी या रॉयल ट्रेनच्या आगमनाने दिमाखात सुरुवात झाली. सोमवारी सकाळी आठ वाजता डेक्कन ओडिसीचे शहरात आगमन झाले असल्याची माहिती औरंगाबाद टुरिझम डेव्हलपमेंट फाऊंडेशनचे अध्यक्ष जशवंत सिंग यांनी दिली.
डेक्कन ओडिसी ही देशातील प्रसिद्ध लक्झरी पर्यटन रेल्वेपैकी एक असून, तिच्या माध्यमातून प्रवाशांना महाराष्ट्रातील ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि पर्यटनस्थळांचा आलिशान प्रवास अनुभवता येतो. रेल्वेच्या आगमनामुळे
छत्रपती संभाजीनगरचा पर्यटन हंगाम सुरू झाल्याचे चित्र आहे. विशेष पर्यटन प्रवासातून अमेरिका, कॅनडा, जर्मनी आणि स्पेन या देशांतील २७पर्यटक शहरात दाखल झाले आहेत. डेक्कन ओडिसीच्या आगमनामुळे रेल्वे स्थानक परिसरात पर्यटनाचा उत्साह
आणि चैतन्याचे वातावरण पाहायला मिळाले. परदेशी पर्यटकांचे भारतीय संस्कृती आणि महाराष्ट्राच्या परंपरेनुसार पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आले. दिलीप खंडेराय यांच्या गटाच्या वतीने पाहुण्यांचे औक्षण, पुष्पगुच्छ आणि पारंपरिक पध्दतीने स्वागत करून
वेरूळ लेण्यांसह दौलताबादला पर्यटकांच्या भेटी
अलिशान अशा डेक्कन ओडिसीचे शहरात आगमन झाल्यानंतर पारंपरिक पद्धतीने पर्यटकांचे स्वागत करून भारतीय संस्कृतीचे दर्शन यावेळी दिलीप खंडेराय ग्रुपच्या वतीने करण्यात आले. त्यानंतर सकाळी आठ वाजता २७ परदेशी पर्यटक वेरूळ आणि दौलताबाद येथील पर्यटनासाठी रवाना झाले. जगप्रसिद्ध वेरूळ लेण्या पर्यटकांना पाहता येत आहे, तसेच दौलताबाद किल्ल्यावर देखील पर्यटक गेले आहेत.
शहराच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वैभवाची ओळख करून देण्यात आली.
परदेशी पाहण्यांनीही या स्वागताला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. महाराष्ट्राच्या पारंपरिक संस्कृतीची झलक अनुभवताना पर्यटकांमध्ये उत्सुकता आणि आनंदाचे वातावरण होते. छत्रपती संभाजीनगरच्या ऐतिहासिक वारशाची ओळख करून घेण्यासाठी आलेल्या या पर्यटकांच्या दौऱ्यामुळे शहरातील पर्यटन क्षेत्रासाठीही नव्या हंगामाची सुरुवात झाली आहे.













